गुंड नकोत तर अजित पवारांना घरी बसवा- गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

पुणे- "भाजप गुंडांचा पक्ष आहे, असा आरोप शरद पवार करत आहेत. नारायण राणे आणि अजित पवारही आमच्या पक्षावर गुंडगिरीचे आरोप करतात. अजित पवारांना आता पुण्यात भवितव्य राहिलेले नाही. म्हणून ते बोलत आहेत. आमच्याकडे आला की गुंड आणि तुमच्याकडे असला की तो सज्जन, हा दुटप्पीपणा राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोडावा. राजकारणात गुंड येऊ नयेत, असे शरद पवारांना वाटत असेल, तर त्यांनी अजित पवारांना घरी बसवून सुरवात करावी,'' अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.

प्रभाग क्र. 18 मधील भाजप उमेदवार विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, अजय खेडेकर, सम्राट थोरात यांच्या प्रचारार्थ रॅलीत बापट यांनी ही भूमिका मांडली. नगरसेवक अशोक येनपुरे, नगरसेवक विष्णू हरिहार, नगरसेविका प्रतिभा ढमाले, स्वीकृत नगरसेवक नामदेव माळवदे या वेळी उपस्थित होते.

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणातील सम्राट थोरात याला दिलेल्या उमेदवारीबाबत बापट म्हणाले, पुतळ्याची घटना घडली, त्या वेळी सम्राट संभाजी ब्रिगेडमध्ये नव्हता. तो चांगले काम करणारा तरुण आहे. कित्येक वर्षे मी त्याला ओळखत आहे. त्याला मुख्य प्रवाहात यायचे होते. आम्ही त्याला संधी दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ही आमची आग्रही भूमिका आहे. मराठा तरुणांना संधी मिळाली पाहिजे. हा आमचा अजेंडाच आहे.

बापट म्हणाले, ""आपल्या शहरातील वाहतूक, कचरा, पाणी, नदी सुधारणा, विकास आराखडा हे मूलभूत प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या गलथानपणामुळेच सुटले नाहीत. वीस वर्षे ही विकासकामे रखडली. राज्यात आपली सत्ता येताच मेट्रो, विकास आराखड्याला मंजुरी अशी किती तरी कामे आम्ही मार्गी लावली."

Web Title: girish bapat political attack on ajit pawar