पाणीटंचाईला गिरीश बापटच जबाबदार - मोहन जोशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

पुणे - ‘‘शहरातील कृत्रिम पाणीटंचाईला पालकमंत्री गिरीश बापट जबाबदार आहेत. त्यांचेच हे महापाप आहे,’’ असे सांगून बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना मतदान होण्यासाठी पालकमंत्र्यांनी कालव्यातून भरपूर पाणी सोडल्याची टीका काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर जोशी यांना विचारले असता, त्यांनी ही टीका केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, संजय बालगुडे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते. 

जोशी म्हणाले, ‘‘शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होता. त्यांचे नियोजन पालकमंत्र्यांना करता आले नाही.  नियोजनशून्य कारभारामुळेच पुणे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.’’

मतदानाच्या दिवशी वडगाव शेरी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात तीन वेळा मशिन बंद पडले. त्या ठिकाणी मतदानाची वेळ वाढविण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे केली होती. परंतु वेळ वाढून देण्यात आली नाही. यावरून प्रशासन भाजपच्या फायद्यासाठी काम करीत होते की काय, अशी शंका निर्माण होत असल्याचे जोशी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना आव्हान 
संजय बालगुडे म्हणाले, ‘‘मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एटीएसचे तत्कालीन अधिकारी धरमवीरसिंग यांच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले होते ‘प्रज्ञासिंह यांनी महाराष्ट्र पोलिसांविरुद्ध तक्रार दिल्यास कारवाई करू.’ त्यानुसार आता मुख्यमंत्र्यांनी धरमवीरसिंगांना अटक करून दाखवावी.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Bapat is responsible for the water scarcity says Mohan joshi