Loksabha 2019 : उमेदवारी आणि विकास कामांचा संबंध नाही : गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे :  ''उमेदवारी व विकास कामे हे वेगळी गोष्ट आहे. याचा उमेदवारी बदलण्याशी काही संबंध नाही. उमेदवार हे पक्ष संघटनात्मक विचार करून नेते हे ठरवतात. मी हे दादांना सांगण्याची गरज नाही. हे त्यांनाही माहिती आहे,''असे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी सांगितले.
 
''राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आजच्या सभेत तुमचा कारभार चांगला म्हणून सांगता. मग विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी का नाकारली, याचे पुणेकरांना उत्तर द्या'' असा सवाल भाजपला केला होता. त्यास बापट यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.  

''पुणे शहरासाठी जाहीरनामा तयार करत आहोत, प्रारूप तयार झाले आहे. आमदार, खासदार यांच्याही सुचना घेऊन त्याला अंतिम स्वरूप देऊन तो जाहीर करू'' ,असे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Girish Bapat Speaks About Ajit Pawar Comment