Loksabha 2019 : गिरीश बापट यांनी दिला राजकीय आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज सकाळी कमला नेहरू उद्यानात ङ्गिरायला, व्यायामाला येणार्‍या नागरिकांच्या भेटी घेतल्या. ज्ञानकोषकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून उद्यानातील समाधीला अभिवादन केले, ज्ञानकोषाचे पूजन केले. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार आणि आता लोकसभेचे उमेवार असा गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास याच परिसरातून सुरू झाला. १९८३ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी झाले होते.

''पहिल्यांदा विजयश्रीची माळ गळ्यात घालणारे मतदार आणि कार्यकर्त्यांच्या बापट यांनी भेटीगाठी घेऊन पहिल्या निवडणुकीच्या आठवणींना उजाळा दिला. माधव ढेकणे, सुभाष महागावकर, शिरीष बोधनी, शाम भुर्के या जुन्या स्नेह्यांशी विशेष संवाद साधला. 
कमला नेहरू उद्यानासमोरील कचेरी, भेळ भत्ता, घरचा डबा आणून अंगतपंगत बसून केलेल्या जेवणावळी, रात्र रात्र जागुन रंगविलेल्या भिंती, हाताने लिहिलेल्या स्लिपा, घरोघरी पोहोचून केलेला वैयक्तिक संपर्क अशा आठवणींना उजाळा दिला.

बापट यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. पहिल्यापासून साथ देणार्‍या कार्यकर्त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. उद्यानात ङ्गिरायला आलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, आदित्य माळवे, महेश लडकत, दत्ता खाडे, संदीप काळे, गणेश बगाडे, दिलीप शेळके, नितीन कुवर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

Web Title: Girish Bapat Speaks About Political memories