Video : पुण्यात बस थांबवून तरुणी म्हणाली, 'चलो, इश्क लड़ाएं' 

सागर आव्हाड
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पुणे : टिक टॉकच्या अॅपची तरुणाईला चांगलीच भुरळ पडली आहे. टिक टॉकच्या नादाने आज काल कोण काय करेल याचा नेम नाही. टिकटॉकवर व्हिडिओ बनविन्यासाठी एक तरुणीने चालू बस थांबवून, त्यासमोर डान्स केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

पुण्यात हडपसर गाडीतळ येथील बस स्टँडवर हा व्हिडिओ शुट केला आहे. या तरुणीने टिक टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क भेकराईला जाणाऱ्या पीएमटी बसला थांबवले आणि डान्स केला. हा प्रकार काल रात्री हा प्रकार घडला. अचानक बससमोर तरुणी डान्स करायला लागल्याने बस चालकही पाहत राहिला.  सुरवातीला काही वेळ त्याला काय चालू आहे तेच समजले नाही. यावेळी बसमध्ये प्रवासी देखील होते.

ही तरुणीने कोण आहे अजून समजू शकलेले नाही. या तरुणीने बडे मिया, छोटे मिया चित्रपटातील गोविदा आणि रविनाच्या  ''चलो, इश्क लड़ाएं'  या गाण्यावर तिने डान्स केला आहे. या तरुणीने भलतेच साहस केल्यामुळे सोशलमिडियावर व्हायरल झाली आहे. ही तरुणी कोण आहे याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a Girl did dance infront of Pmpml bus in pune