पुणे सोलापूर मार्गावर शिवशाही बसने चिरडले चिमुरडीला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

टोल कंपनीने दोन्ही बाजूला बस थांब्याची सोय केली आहे. मात्र एकही एसटी या बसथांब्यावर थांबत नाही. गावातून उड्डाणपुलावरून सर्व बस सुसाट वेगाने जातात. यामुळे बस थांबे ओस पडले आहेत. परिणामी लोकांना उड्डाणपुलावर चढून जावे लागते. यामुळे येथे अनेक अपघात झाल्याची उदाहरणे आहेत.

कळस : पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी देवकर (ता. इंदापूर ) गावातील उड्डानपुलावर शिवशाही बसने (क्र. एम.एच.09 व्ही.एम. 9218) येथील तीन वर्षीय चिमुरडी रिया प्रेमकुमार गौतम हिला चिरडल्याची घटना आज सकाळी साठेआठ वाजता घडली. येथील एमआयडीसीमध्ये मजुरी करणाऱ्या बिहारवरून आलेल्या कुटुंबाची रिया एकुलती एक मुलगी होती. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी काही वेळासाठी महामार्ग रोखून धरला. इंदापूरचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार, महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत अभंग यांनी स्थानिकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठ वाजता रिया उड्डाणपुलावरील रस्ता ओलांडत असताना वेगाने आलेल्या शिवशाही बसने तिला जोराची धडक देऊन चिरडले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी बस रोखून धरत महामार्गावरील वाहतूक अडवून धरली. टोल कंपनीचे गस्तीचे वाहन फोन करूनही दोन तास उशिरा आल्याने ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. दरम्यान इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार, महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत अभंग यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना शांत केले. यावेळी ग्रामस्थांनी उड्डाणपुलावरून सुसाट जाणाऱ्या एसटी बसला सेवा रस्त्याचा वापर करण्याबाबत सूचना देण्याची मागणी केली. येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गायकवाड व बाळासाहेब तोंडे म्हणाले, लोणी देवकर येथे सर्व प्रकारच्या एसटीसाठी बस थांबा मंजूर आहे.

‘महाविकास’ची समन्वय समिती

टोल कंपनीने दोन्ही बाजूला बस थांब्याची सोय केली आहे. मात्र एकही एसटी या बसथांब्यावर थांबत नाही. गावातून उड्डाणपुलावरून सर्व बस सुसाट वेगाने जातात. यामुळे बस थांबे ओस पडले आहेत. परिणामी लोकांना उड्डाणपुलावर चढून जावे लागते. यामुळे येथे अनेक अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या थांब्यांवर प्रत्येक एसटीने सेवा रस्त्याचा वापर करून थांबणे गरजेचे आहे. तशा सूचना देणे महत्त्वाचे आहे. याशिवाय उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स दुभाजकाला जाळी बसविण्याचे काम करावे या मागण्या आम्ही कंपनीकडे केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl died in accident on Pune Solapur highway