पुणे : शिरूरजवळ बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

जांबूत (ता. शिरुर) जोरीलवन येथे समृद्धी योगेश जोरी (वय 2) घराच्या उंबऱ्यातून बिबट्याने उचलून नेऊन ठार केले.

टाकळी हाजी (पुणे) : जांबूत (ता. शिरुर) जोरीलवन येथे समृद्धी योगेश जोरी (वय 2) घराच्या उंबऱ्यातून बिबट्याने उचलून नेऊन ठार केले.

येथील खंडोबा मंदिराजवळ नवरात्र गरब्याचा कार्यक्रम सुरु होता. नागरिकांनी धाव घेऊन मुलीला बिबट्याच्या तावडीतून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न असफल ठरला. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान, या भागात बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a girl dies in leopard attack at shirur