मोशीमध्ये वृद्धाने केला तरुणीचा विनयभंग

crime_logo
crime_logo

पिंपरी (पुणे) : एका वृद्धाने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना मोशी येथे घडली.

नारायण पोखरकर (वय ६०, रा. साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वृद्धाचे नाव आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी बनकर वस्ती, मोशी येथे आपल्या घरात होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी पोखरकर याने "मला तुमच्या बद्दल प्रेमभाव आहे", असे म्हणत अश्लील चाळे करत तरुणीचा विनयभंग केला. सहायक पोलिस निरीक्षक शिंदे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com