बारामतीत पित्याकडून मुलीचे सात वर्षे लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

सतत सात वर्षे आपल्या पोटच्या मुलीचेच लैंगिक शोषण करणाऱ्या पित्याविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बारामती : सतत सात वर्षे आपल्या पोटच्या मुलीचेच लैंगिक शोषण करणाऱ्या पित्याविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सन 2013 रोजी पहिल्यांदा संबंधित मुलीला मासिक पाळी आल्यानंतर पोटात दुखते त्यावर माझ्याकडे उपाय आहे, असे सांगत या पित्याने मुलीचे शोषण सुरु केले.

13 डिसेंबर 2013 ते मार्च 2020 पर्यंत सलग सात वर्षे दमदाटी करत धमक्या देत पित्याने या मुलीवर वेऴोवेळी बलात्कार केला. हा प्रकार असह्य झाल्यानंतर मुलीने आई व नातेवाईकांना या प्रकाराची कल्पना दिल्यावर सर्वांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पित्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरिक्षक अश्विनी शेंडगे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Physically Harassment by Father