लग्नापूर्वीच धोका! तरुणीची कागदपत्रं घेऊन प्रियकरानं ठोकली धूम; पुण्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021

याप्रकरणी गोव्यातील एका 28 वर्षीय तरूणीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्‍टोंबर 2019 ते 13 फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये घडला आहे.

पुणे : तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तेवढ्यावरच ना थांबता लग्नासाठी नोंदणी करण्यापूर्वीच तरुणीची महत्वाची कागदपत्रे घेऊन प्रियकराने धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रियकरासह त्यास मदत करणाऱ्या चौघांविरुद्ध फसवणूक, अपहार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस सुरेश शेलार (वय 33, रा. एरंडवणे), अमित यशवंतराव पापळ (वय 35), अभिषेक यशवंतराव पापळ (वय 33) या तिघांसह त्यांच्या 35 वर्षीय मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोव्यातील एका 28 वर्षीय तरूणीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्‍टोंबर 2019 ते 13 फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये घडला आहे.

आएशाचा शेवटचा कॉल होतोय व्हायरल; नवरा म्हणाला 'जीव देतानाचा व्हिडिओ पाठवून दे'!​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस शेलार याने फिर्यादीस 'तू मला आवडते माझे तुझ्यावर प्रेम आहे,' बोलून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिचा विश्‍वास प्राप्त केल्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच या प्रकाराबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकीही त्याने दिली.
दरम्यान, फिर्यादी आणि शेलार हे दोघेजण जानेवारी 2021 मध्ये नाशिकमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी शेलारने त्याच्या ओळखीच्या आरोपींची फिर्यादीस ते पोलिस असल्याची ओळख करून दिली.

 

पुणे : पीएच.डी करणाऱ्या तरुणाचा समलिंगी संबंधातून खून; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न​

त्यानंतर त्याने फिर्यादीकडील मोबाईल फोन, मतदार कार्ड अशा वस्तू काढून घेतल्या. त्यानंतर तरूणीला 13 फेब्रुवारीला तरुणीला पुण्यातील मामलेदार कचेरी येथे नोंदणीकृत पद्धतीने लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादी स्वच्छतागृहामध्ये गेली, त्यावेळी तेजसने तिला निराधार सोडून तिची महत्वाची कागदपत्रे घेऊन तेथून पळून गेला. या घटनेनंतर फिर्यादीने पोलिस ठाणे गाठून आरोपीसह त्यास मदत करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl sexually abused in love affair and her boyfriend fled with important documents in Pune