‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीने आयटी इंजिनिअर असलेल्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरण दडपण्यासाठी लग्न करण्याचे आश्‍वासन देऊन तिला खोटे नाव सांगण्यास लावले. त्यानंतर हा प्रियकर पळून गेल्याने या तरुणीने त्याच्यावर बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे.  

२६ वर्षीय तरुणीने यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अमित नंदकिशोर जोशी (वय २४, रा. कात्रज, मूळ रा. धुळे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोघांची अडीच वर्षांपासून ओळख आहे. अमितने तिला लग्नाचे वचन दिले होते. हे दोघे काही महिन्यांपासून ‘लिव्ह इन’मध्ये राहात होते. अमित हा लग्नाचा विषय टाळत असल्याने ती त्याच्यामागे तगादा लावत होती; त्याने लग्नास नकार दिल्याने तरुणीने फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आत्महत्येसंदर्भात पोलिसांना खरी माहिती देऊ नकोस, मी तुझ्याशी लग्न करतो, असे अमितने तिला सांगितले. तिने पोलिसांना खोटे नाव सांगून तसा जबाब दिला. मात्र, ती बरी होताच अमित गावाकडे निघून गेला, तिने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने टाळाटाळ केली. तिने गावाकडे अमितची भेट घेतली; पण त्याने लग्नास नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com