Women's Day 2019 : फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थिनींनी काढली शांतता फेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मार्च 2019

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त या शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ​

महिला दिन 2019
पुणे : 'देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता महिलेमध्ये आहे', 'दहेज हटावो, समाज बचावो', 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असे फलक हाती घेत महाविद्यालयीन युवतींनी शांतता फेरीद्वारे 'स्त्री सक्षमीकरणाचा संदेश दिला.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त या शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. परदेशी बोलत होते. उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या शांतता फेरीत शंभरहुन अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरण, महिला संरक्षण, स्त्री भ्रूण हत्येला विरोध, हुंड्याला विरोध आदी विषयांच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रूबिना मुल्ला , शर्मिला येवले, रूपाली शिंदे, अमृता काथे, निर्मला तळपे यांनी संयोजन केले.

"एकाच वेळेला अनेक अवधाने सांभाळत आयुष्य जगणार्‍या महिलांनी विज्ञान, संरक्षण, अवकाश अशा जीवनातील आव्हानात्मक क्षेत्रांतही कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. महिलांच्या प्रगतीचा उंचावलेला आलेख देशाला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवेल," असा विश्‍वास फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी व्यक्त केला.

pune

Web Title: Girl Students in Fergusson College had a peace round on Womens Day