ओळख इन्स्टाग्रामवर, शेवट व्हॉट्‌सऍपवर; तरुणीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

तू मला विसरून जा! 
ऋषीने सेजलला शेवटचा व्हॉट्‌सऍप मेसेज केला. त्यात त्याने म्हटले, की "आपल्यात आता कोणतेही नाते राहिले नाही. तू मला विसरून जा. माझ्यावर व्यवसायाची जबाबदारी असल्याने मला खूप काम पडते. मी तुला वेळ देऊ शकत नाही.' 

पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे तरुणाने व्हॉट्‌सऍपवरील चॅटिंगमध्ये प्रेमास नकार दिला होता. ही घटना चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर परिसरात घडली. 

सेजल विजय पावसे (वय 20, रा. हनुमाननगर, वडारवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ऋषी नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेजल ही सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सांगली येथील ऋषी नावाच्या तरुणाबरोबर इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना व्हॉट्‌सऍप नंबर दिले. तेव्हापासून दोघांमध्ये सातत्याने व्हॉट्‌सऍपवर गप्पा होत होत्या. सेजल व ऋषीमध्ये सुरू असलेल्या संवादाची माहिती फिर्यादी यांना मिळाली. ही बाब ऋषीच्या लक्षात आली. त्यानंतर तो सेजलबरोबर बोलण्यास टाळाटाळ करू लागला. या प्रकारामुळे सेजल नैराश्‍येच्या गर्तेत अडकली. त्यातूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

तू मला विसरून जा! 
ऋषीने सेजलला शेवटचा व्हॉट्‌सऍप मेसेज केला. त्यात त्याने म्हटले, की "आपल्यात आता कोणतेही नाते राहिले नाही. तू मला विसरून जा. माझ्यावर व्यवसायाची जबाबदारी असल्याने मला खूप काम पडते. मी तुला वेळ देऊ शकत नाही.' 

Web Title: girl suicide after boy rejected love in Pune