शिवनेरीवर झाडाला गळफास घेऊन मुलीची आत्महत्या 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 15 जून 2018

जुन्नर (पुणे) : ऐतिहासिक किल्ले शिवनेरीच्या पहिल्या दरवाजा जवळ सुहानी रघुनाथ खंडागळे (वय 15 रा.हनुमानवाडी-पिंपळगाव सिद्धनाथ ता.जुन्नर) या मुलीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी (ता 15) रोजी उघडकीस आली आहे. 

पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी सांगितले की,सुहानी आपल्या राहत्या घरातून रात्रीच्या सुमारास दुचाकी घेऊन बाहेर पडली होती. आज शुक्रवार (ता.15) पहाटेच्या सुमारास तिने झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

सुहानी येथील कृष्णराव मुंढे विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होती. रात्री भावासोबत तिने चित्रपटही पहिला असल्याचे सांगण्यात आले. शाळेच्या विविध स्पर्धात तिचा सहभाग असायचा ती शांत, मनमिळाऊ व अभ्यासू विद्यार्थिनी होती असे शाळेतुन सांगण्यात आले. घटनास्थळी तिने आणलेली मोटार सायकल मिळून आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.डी.नवघरे करत आहेत. 

Web Title: a girl suicide with hanging at shivneri