गर्लफ्रेंडसोबत मौजमजेसाठी  चोरल्या चौदा दुचाकी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

मौजमजेसाठी गर्लफ्रेंडसोबत फिरायला जाणाऱ्या दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील 12 गुन्हे उघडकीस आले; तसेच 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या. 

पिंपरी : मौजमजेसाठी गर्लफ्रेंडसोबत फिरायला जाणाऱ्या दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील 12 गुन्हे उघडकीस आले; तसेच 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या. 

हिमांशू ऊर्फ पप्या योगेश सोळंकी (वय 20, रा. चौधरी पार्क, गुरुद्वारा मार्ग, दिघी), निखिल ऊर्फ सोनू संतोष जाधव (वय 19, रा. दिघी गावठाण), आशिष ऊर्फ अश्‍या रोहिदास जाधव (वय 21, रा. चौधरी पार्क, दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोमाटणे फाटा येथे तीनजण चोरीच्या दुचाकीसह थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र, चोरांना पोलिसांचा सुगावा लागल्याने ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असून, त्याबाबत तळेगाव दाभाडे ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सखोल चौकशी केल्यावर कळाले, की त्यांनी मौजमजेसाठी गर्लफ्रेडसोबत फिरायला जाण्यासाकरिता पुणे परिसरातून एकूण 14 वेगवेगळ्या दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. तसेच, चोरीच्या दुचाकी ते राहात असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर लपवून ठेवल्याचे तपासात पुढे आले. या आरोपींकडून दिघी, भोसरी, वाकड, तळेगाव दाभाडे, फरासखाना, हडपसर, वडगाव मावळ, विमानतळ या पोलिस ठाण्यांतील 12 गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for girlfreind theft 14 two wheelar