चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीचा गळा आवळून खून

Sonali
Sonali

धायरी - चारित्र्याचा संशय घेऊन, प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना नऱ्हे येथील झील महाविद्यालयाजवळील एका इमारतीत आज उघडकीस आली. मृतदेह पाच दिवस घरात पडून होता.   

सोनाली आनंदराव भिंगारदिवे (वय २३, मूळ रा. विजयनगर, कराड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. सोनाली १९ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी सिंहगड पोलिस संशयित आरोपी सोमेश घोडके याचा शोध घेत आहेत.  

सोनाली येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती; तर सोमेश हा महाविद्यालयाजवळ खोली भाड्याने घेऊन राहात होता. त्याने घरमालकाला सोनालीबरोबर लग्न झाल्याचे सांगितले होते. 

सोमेश हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या रागातून त्याने गळा आवळून खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. खून केल्यानंतर सोमेश घराला बाहेरून कडी लावून फरार झाला. इमारतीमधील आजूबाजूच्या नागरिकांना घरातून उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी घरमालकाला कळवले. त्या वेळी त्यांनी घर उघडून पाहिले असता, सोनाली मृतावस्थेत आढळली.

दरम्यान, आरोपी सोमेशने खून केल्यानंतर चिठ्ठी लिहून ठेवली असून, आत्महत्या करणार असल्याचे त्यात नमूद केले आहे.याप्रकरणी झोन तीनचे उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते, सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार, संगीता यादव आदींनी घटनास्थळी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com