#Cybercrime फसवणुकीचा गुलाबी डाव!

बुधवार, 13 जून 2018

पुणेः हॅलो सर, गर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेस मधून बोलतेय, तुम्हाला डेट किंवा शारिरीक संबंधासाठी कोणी हवे का? अशा मुलीच्या आवाजात फोन आला तर सावध रहा. मोबाईलवरून युवकांशी संपर्क साधून बॅंक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे, यामुळे अशा दूरध्वनींपासून दूर रहावे, असे आवाहन पोलिस निरिक्षक अशोक इंदलकर यांनी 'सकाळ'शी बोलताना केले.

पुणेः हॅलो सर, गर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेस मधून बोलतेय, तुम्हाला डेट किंवा शारिरीक संबंधासाठी कोणी हवे का? अशा मुलीच्या आवाजात फोन आला तर सावध रहा. मोबाईलवरून युवकांशी संपर्क साधून बॅंक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे, यामुळे अशा दूरध्वनींपासून दूर रहावे, असे आवाहन पोलिस निरिक्षक अशोक इंदलकर यांनी 'सकाळ'शी बोलताना केले.

एका युवकाच्या मोबाईलवर पुजा (बनावट नाव) नावाच्या मुलीने संपर्क साधला. आमची कंपनी देशभर विविध प्रकारच्या सेवा पुरविते. सर, तुम्हाला डेट किंवा शारिरीक संबंध ठेवण्यासाठी मुली पाहिजेत का? 'हो' म्हणून उत्तर दिले तर संबंधित मुलगी अगदी गोड बोलून जाळ्यात ओढते. मोबाईलवर तत्काळ एसएमएस करून बॅंकेचे डिटेल्स पाठविते. नोंदणी शुल्क म्हणून पंधराशे रुपये भरावे लागतील. तुम्हाला तुमच्या शहरामध्ये सुविधा देऊ. पैसे भरल्यानंतर व्हॉट्सऍपवरून मुलींचे छायाचित्र व संपर्क देऊ. शिवाय, उत्कृष्ठ हॉटेलमध्ये सोय करण्याचे आश्वासन देते. बॅंकेत पैसे भरण्यासाठी सतत दूरध्वनी करत राहते.

देशभरामध्ये अनेकांना गोड बोलून आर्थिक गंडा घातला जातो. एकदा बॅंक खात्यामध्ये काही पैसे भरले की पुढचे आमिष दाखवून वारंवार पैसे भरण्यासाठी भाग पाडते जोपर्यंत पैसे मिळत जातात तो पर्यंत गोड बोलणारी मुलगी छान बोलत राहते. परंतु, एकदा पैसे मिळण्याची शक्यता बंद झाल्याची अशी खात्री पटली की अश्लिल भाषेत शिव्या देऊन ती मुलगी मोबाईल बंद करते तो कायमचाच. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. परंतु, शारिरीक संबंधाचा विषय असल्यामुळे अनेकजण तक्रार करण्याचे धाडस करत नाहीत, यामुळे अनेकजण फसवणूकीचे बळी पडताना दिसतात.

...अशा दूरध्वनींपासून दूर रहा
बनावट मोबाईल क्रमांकावरून फोन करून तुम्हाला जाळ्यात ओढण्याचे काम केले जाते. यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेक युवक हे आर्थिक फसवणूकीचे बळी पडतात. शिवाय, एकदा संपर्क झाला की मोबाईलवर व्हॉयरस पाठवण्याची शक्यता असते. तुमची महत्त्वाची माहिती त्यांच्या हातात जाण्याची शक्यत असते, यामुळे अशा बनावट दूरध्वनीपासून दूर रहावे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न ठेवणेच चांगले. फसवणूक झाल्यास कोणतीही शंका मनामध्ये न ठेवता, पोलिसांशी संपर्क साधावा, असा सल्ला श्री. इंदलकर यांनी दिला आहे.

याबाबत आपले मत नोंदवा सकाळ फेसबुक - @SakalNews व ट्विटर - @eSakalUpdate 
ई-मेल करा - webeditor@esakal.com

Web Title: girls fake calling racket