मुलींची सुरक्षा कुणाच्या भरवशावर? - ‘आप’चा सवाल

आम आदमी पार्टी पुणे (आप) आणि आप पालक युनियनतर्फे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा मूक निषेध करण्यात आला.
Aap Party Agitation
Aap Party AgitationSakal
Summary

आम आदमी पार्टी पुणे (आप) आणि आप पालक युनियनतर्फे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा मूक निषेध करण्यात आला.

पुणे - ‘मुलींची सुरक्षा (Girls Security) कुणाच्या भरवशावर?, ‘स्मार्ट सिटीत (Smart City) अडीच महिन्यात ६१ बलात्कार’, ‘दामिनी भरोसा सेल (Damini Bharosa Sale) काय करतात’, ‘ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेला जबाबदार कोण?’ अशा स्वरूपाचे प्रश्न हातात फलक घेऊन उपस्थित करत पालकांनी अल्पवयीन मुलींवर (Minor Girl) शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराचा (Sexual Harassment) तीव्र निषेध नोंदविला.

आम आदमी पार्टी पुणे (आप) आणि आप पालक युनियनतर्फे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा मूक निषेध करण्यात आला. जंगली महाराज रस्त्यातील प्रज्ञा शिल्प चौकात काळ्या फिती लावून आणि हातात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करणारे फलक धरत कार्यकर्ते आणि पालक उपस्थित होते.

‘आप’चे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले, ‘स्मार्ट सिटीत रस्त्यावरील अपघाताच्या भीतीचे दडपण पालक वर्गावर होतेच, आता शाळेच्या आतील सुरक्षा सुद्धा बेभरवाश्याची होणे ही बाब अत्यंत गंभीर बाब आहे. त्याचे मुलींच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतात. शिक्षणाच्या माहेरघराची व्यवस्था सुधारण्याचे काम आता शिक्षण मंडळ, शाळा व्यवस्थापन आणि पोलिस यांच्यावर आहे. पालकांचा सहभाग, विश्वास आणि संवादाचे वातावरण , लैंगिक शिक्षण हे दीर्घकालीन जागृतीचे उपक्रम राबवणे सुद्धा गरजेचे आहे.’

यावेळी वैशाली डोंगरे, सतीश यादव, दिनेश चौधरी, शंकर थोरात, विकास लोंढे, रमेश पाटील, तेजस डोंगरे, जयश्री डिंबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com