मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत - आदित्य ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - ""मुलींनी समाजात घडणाऱ्या घटनांविषयी जागृत होऊन स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत. जोखीम घेण्याची आणि कृती करण्याची तयारी मुलींनी दाखवली तर नक्कीच बदल घडेल,'' असे मत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केले. 

पुणे - ""मुलींनी समाजात घडणाऱ्या घटनांविषयी जागृत होऊन स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत. जोखीम घेण्याची आणि कृती करण्याची तयारी मुलींनी दाखवली तर नक्कीच बदल घडेल,'' असे मत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केले. 

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वूमेन (बीएनसीए) येथील "यो क्‍लब' या स्वसंरक्षणार्थ शिक्षण देणाऱ्या उपक्रमाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थिनींनी ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले आणि ठाकरे यांच्यासोबत सेल्फीही क्‍लिक केली. शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, संपर्क प्रमुख उदय सामंत यांच्यासह कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य मोहना कदम, किरण बऱ्हाटे, डॉ. शुभदा कमलापूरकर, प्रा. उमेश चव्हाण, प्रा. संजय शिंदे, प्रा. निकिता गुरव उपस्थित होते. मेहुल व्होरा आणि सहकाऱ्यांनी विद्यार्थिनींना स्वरक्षणासाठीची प्रात्यक्षिके करून दाखविली. 

तरुणींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर युवा सेनेतर्फे बिबवेवाडी, येरवडा आणि कर्वेनगर येथील महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. विद्यार्थिनींसाठी खास शिबिर आयोजिले होते. त्यात ठाकरे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. शहर प्रमुख महादेव बाबर, रघुनाथ कुचिक, महापालिकेचे गटनेते संजय भोसले, अशोक हरणावळ, राजेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या संगीता ठोसर आदी उपस्थित होते. 

"सोशल मीडिया'च्या माध्यमातून समाजाशी जोडणे हे चांगले असले तरी, घराबाहेर पडताना मुलींनी सतर्कता बाळगायला हवी. स्वसंरक्षणासंदर्भात मुलींमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. समाजात वावरण्याचा एक आत्मविश्‍वास मुलींनी स्वतःमध्ये बाळगावा. 
- आदित्य ठाकरे, अध्यक्ष, युवा सेना 

Web Title: Girls should take self-protection lessons says Aditya Thackeray