पालखी मार्गातील शेतकऱ्यांना पाचपट मोबदला द्या

संतोष आटोळे 
मंगळवार, 12 जून 2018

शिर्सुफळ : बारामती नगरपरिषदेत समावेश झालेल्या रुई येथील ज्या शेतकऱ्यांच्या पालखी मार्गासाठी जमिनी जाणार आहेत. त्यांना शासकिय दराच्या पाचपट मोबदला द्यावा.अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली. बारामती नगरपरिषद मधील रुई मधुन देहू ते पंढरपुर हा प्रस्तावित पालखी मार्ग जात आहे. यासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या अडचणी मांडल्या.

शिर्सुफळ : बारामती नगरपरिषदेत समावेश झालेल्या रुई येथील ज्या शेतकऱ्यांच्या पालखी मार्गासाठी जमिनी जाणार आहेत. त्यांना शासकिय दराच्या पाचपट मोबदला द्यावा.अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली. बारामती नगरपरिषद मधील रुई मधुन देहू ते पंढरपुर हा प्रस्तावित पालखी मार्ग जात आहे. यासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या अडचणी मांडल्या. याप्रसंगी माजी सरपंच मच्छिंद्र चौधर, नवनाथ चौधर, विठ्ठलराव चौधर, किशोर खाडे, चंद्रकांत चौधर, सागर चौधर, काशीनाथ चौधर, राघू चौधर, दादा चौधर, सचिन कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
   

यावेळी राष्ट्रवादी युवक चे उपाध्यक्ष नवनाथ चौधर यांनी मार्गावर ग्रीन झोनचे फक्त 3 गट असल्याने येत असलेली अडचण पाहून ते गट निवासी झोन करावे अशी मागणी केली. यावर प्रांताधिकारी निकम यांनी असे प्रसंग कवचित येत असतात तरीही आर झोन करून देण्याचा प्रत्यन करू असे सांगितले. निकम यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या व  बोलताना म्हणाले, ज्या भागातून रस्ता जाणार आहे.त्या भागात विकासाला अधिकाधिक वाव मिळणार आहे .ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्या दराबाबतच्या मागण्या शासनस्तरावर कळविण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Give farmers five times remuneration in Palkhi route