‘अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना एकरी ५० हजार द्या’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा पीकविमा कंपन्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित झालेला नाही. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून, त्यांना मदत मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली.

पुणे - जिल्ह्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा पीकविमा कंपन्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित झालेला नाही. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून, त्यांना मदत मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

जिल्ह्यातील भात, मका, ऊस, फुले, सोयाबीन, तूर, कांदा, बाजरी, द्राक्ष, उडीद, फळ व भाजीपाला पिके केली होती. अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ‘वादळी पाऊस’ पडून नुकसान झाले आहे. 

शेतकऱ्यांना २०१८ चा पीकविमा अजून मिळालेला नाही. ’आधार लिंक’चे कारण सांगून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. कृषी विभाग विमा कंपन्या व जिल्हा प्रशासन यांना सक्तीचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची व्यवस्था सरकारने तत्काळ करावी. 

सचिव महादेव मातेरे, प्रशांत धुमाळ, संदीप लहाने पाटील, प्रमोद धुमाळ, सपना माळी, सुनीता भगत, वंदना मोडक, दीपाली कवडे, रोहिणी सावंत आदी या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give fifty thousand rupees to raiaffected farmers