स्मार्ट पुण्यासाठी राष्ट्रवादीला संधी द्या - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

वारजे माळवाडी - ""माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेने चांगले काम केल्याने स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमांकावर आपली महापालिका आली. पुणे अधिक स्मार्ट सिटी करण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच महापालिकेत संधी द्या,'' असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रुक्‍मिणी समाज मंदिराचे उद्‌घाटन मुंडे यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी माजी राज्यमंत्री सुरेश धस, नगरसेवक दिलीप बराटे, शिक्षण मंडळ सदस्य बाबा धुमाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, सायली वांजळे, हर्षदा वांजळे, हिंद केसरी योगेश दोडके, किसन राठोड, नयना डोळसकर, शांता नेवसे, हिरालाल राठोड, ओंकार जाधव, दिनकर दांगट, प्रमोद शिंदे, बाळासाहेब पोळ, संजय हिंगे, गोविंद उगले, बापा डोंगरे, अर्जून शेळके, भागवत शिंदे, हनुमंत राठोड, रमेश खेतावत, संतोष पंधारे उपस्थित होते.

""देशात नोटाबंदीसारखे महंमद तुघलकी निर्णय घेतले जात आहेत. राज्यातील 11 मंत्र्यांविरोधातील घोटाळे पुराव्यानिशी सादर केले आहेत. बॅंकेच्या रांगेत थांबणे ही देशभक्ती असते का? मजुरांना बॅंकेतील त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसतील, तर महापालिका निवडणुकीत तो राग व्यक्त करा,'' असे सांगून मुंडे म्हणाले, ""खासदार सुप्रिया सुळे यांचादेखील लोकसभेचा मतदारसंघ आहे. येथील विविध कामे करण्यासाठी 80 कोटी रुपयांचा विकास निधी मिळविण्यात दोडके यांनी पाठपुरावा केला आहे.''
""या समाज मंदिराची जागा सुमारे 1134 चौरस मीटर आहे. "ऍमिनिटी स्पेस' म्हणून ही जागा पालिकेच्या ताब्यात आली होती. वाहनतळासाठी जागा सोडून 815 चौरस मीटरचे दोन मजली बांधकाम केले आहे. यासाठी मागील तीन वर्षांत 85 लाख रुपये खर्च झाला आहे. स्थानिकांच्या विविध कार्यक्रमांसाठी हे सभागृह नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येईल,'' असे दोडके यांनी सांगितले.

Web Title: Give the opportunity to the ncp- Dhananjay Munde