आम्ही कसं जगायचं? तमाशाला परवानगी पण यात्रा बंदच, कलावंतांवर उपसामारीची वेळ

Give Permission to start Yatra  said flak Artist after permission given to tamasha
Give Permission to start Yatra said flak Artist after permission given to tamasha

टाकळी हाजी : लोकमनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा ही कला नेहमीच प्रबोधन करण्यासाठी अव्वल ठरली आहे. लोकनाट्य तमाशाची परंपरा टिकवून ठेवणारे कलावंत कोरोनाच्या काळात तमाशा बंद असल्याने उपासमारी सारख्या समस्येला सामोरे गेले. आता शासनाने लोकनाट्य तमाशा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रा सुरू न झाल्यामुळे फड मालक कर्जात बुडतील तर तमाशा रंगभूमी चे कलावंत दिसेनासे होतील. कोरोना बाबत नियम पाळून लोकनाट्य कला सादर करू, ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू करा अशी मागणी राष्ट्रपती पारीतोषीक विजेत्या व तमाशा फडमालक मंगला बनसोडे यांनी केली आहे. 

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

कोरोनाच्या प्रादर्भावामुळे लोकनाट्य तमाशाची कला बंद पडली होती. त्यानंतर तमाशा कलावंतानी लोकनाट्य तमाशा सुरू करावा अशी मागणी शासन दरबारी केली होती. त्यानंतर ही कला सादर करण्याची परवानगी देण्यात आली. याबाबत करवडी ( ता. कराड ) येथे तमाशा कलावंताचे कोरोनाकाळात बेरोजगारी व झालेले हाल या बाबत त्यांनी प्रतीक्रिया व्यक्त केल्या. 

बनसोडे म्हणाल्या की, वर्षातील आठ महिने गावोगावी फिरून लोकनाट्य कला सादर केली जाते. समाजाचे प्रबोधन व मनोरंजन करण्यासाठी ही कला पारंपारीक कला म्हणून ओळखली जाते. कोरोनामुळे ग्रामदैवतांच्या यात्रा बंद पडल्या त्यातून लोकनाट्य तमाशा बंद झाले. यामुळे फडमालकांना या कलाकारांना काही दिवस संभाळावे लागले. मात्र गेली दहा महिने या कलावंताना रोजगार नसल्याने दारोदार रोजगारासाठी फिरावे लागत आहे. नृत्य कला सादर करणाऱ्या नृत्यीकांना प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्यांनी डोक्यावर घेतले. पण त्यांना मोलमजूरीने काम करावे लागत आहे. 2015 पासून लोकनाट्य तमाशा फडांना उतरती कळा आली आहे. यापुढील काळात शासनाने या कलावंताकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी दिली. त्याप्रमाणे लोकनाट्य तमाशाला देखील परवानगी मिळाली आहे. मात्र ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रा सुरू झाल्या नाहीत तर लोकनाट्य तमाशा फडमालक व कलाकार यांच्या वर अधिकच उपासमारी वेळ येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

परवानगीने रंगरंगोटीला सुरवात...
लोकनाट्य तमाशा ला परवानगी मिळाल्याने फड मालकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून तमाशा केंद्रस्थानी रंगमंचाची रंगरंगोटी व गाड्या पुन्हा सजू लागल्या आहेत. ग्रामदैवतांच्या यात्रांना परवानगी मिळाली की कलाकारांच्या सरावाला देखील सुरूवात केली जाईल. सध्या रंगमंच, गाड्या, पडदे, साहित्यांना रंगरंगोटीचे काम सुरू केले आहे. साधारणतः फेब्रुवारी मध्ये तमाशा फड राज्याच्या दौऱ्यावर जातील. असे नितीन बनसोडे करवडीकर यांनी सांगितले. 

करवडी ( ता. कराड ) लोकनाट्य तमाशाला परवानगी मिळाल्यामुळे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांच्यावर केंद्रावर साहित्याच्या रंगरंगोटीला सुरवात झाली आहे. वेशभुषा आणी रंगभुषा करण्यासाठीच्या या पेट्या आता पुन्हा सजू लागल्या आहेत.

युवक दिन विशेष : कौशल्यासह हवा काम करण्याचा दृढ निश्‍चय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com