पुणे कॅंटोन्मेंटमध्ये मराठा भवनासाठी जागा द्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - पुणे कॅंटोन्मेंट परिसरामध्ये मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पुणे कॅंटोन्मेंट समन्वय समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांना मंगळवारी देण्यात आले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

बाबाजान चौकात बांधलेल्या महिला वसतिगृहास "राजमाता जिजाऊ वसतिगृह' असे नाव द्यावे, मराठा वॉर मेमोरिअल स्तंभ परिसराचे सुशोभीकरण करावे, मराठा भवनासाठी जागा द्यावी, छत्रपती शिवाजी मार्केटमधील शिवरायांच्या पुतळ्याचा परिसर सुशोभित करावा, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करावे यांसह विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. 

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांच्यासह अनिल ताडगे, अनिल मारणे, किशोर मोरे, पुणे कॅंटोन्मेंटचे समन्वयक राजाभाऊ चव्हाण, राजेंद्र म्हस्के, सुनील शिंदे, नीलेश कणसे, मनोज घाटे, अण्णा गव्हाणे, प्रदीप चव्हाण, मनोज शिंदे, दिलीप जाधव, हरीश बोडके, सुनील जाधव, किरण शिंदे, विजय महाडिक, सुमीत गावडे, निखिल टेकावडे आदी या वेळी उपस्थित होते. 

Web Title: Give place for Maratha Bhavan in Pune Cantonment