‘रोबोकॉन’ला अभ्यासक्रमात स्थान द्यावे - डॉ. संजय धांडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे - रोबोकॉनसारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना अंगभूत कौशल्य, स्वतंत्र विचार आणि गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. म्हणूनच महाविद्यालये आणि विद्यापीठस्तरावर रोबोकॉन प्रकल्पांना अभ्यासक्रमात वेगळे स्थान देण्याची गरज आहे, असे मत आयआयटी कानपूरचे माजी अध्यक्ष डॉ. संजय धांडे यांनी व्यक्त केले.  

बाराव्या एबीयू राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेला नुकतीच सुरवात झाली. दूरदर्शन व एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (आळंदी) यांच्यातर्फे चार मार्चपर्यंत ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. धांडे बोलत होते. डॉ. विश्‍वनाथ कराड, स्पर्धेचे मुख्य समन्वयक डॉ. सुनील कराड, दूरदर्शन (मुंबई विभाग) उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, प्रा. पी. बी. जोशी उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान ११२ महाविद्यालयांतील स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेची सुरवात आयआयटी वडोदरा व सीओईपी यांच्यातील सामन्याने झाली. 

डॉ. धांडे म्हणाले,‘‘रात्रंदिवस मेहनत करून विद्यार्थी रोबोसंबंधीचे प्रकल्प सादर करीत असतात.  हे प्रकल्प सुरू करण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. शिक्षकांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.’’

Web Title: give place robokonala curriculum