प्लास्टिक पिशव्या द्या आणि रोपटे घ्या उपक्रम, तब्बल 152 किलो जमा

ज्ञानेश्वर भंडारे
शुक्रवार, 27 जुलै 2018

वाल्हेकरवाडी (पुणे) - प्लास्टिक बंदी वर शासनाच्या निर्णयात जरी बदल होण्याची शक्यता असली तरी प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम पहाता प्लास्टिक वापर टाळावा म्हणुन अश्याप्रकारचे जागरुकीकरण अभियान राबविण्यात येत आहे. गेला महिनाभर पिंपरी चिंचवडमध्ये अंघोळीची गोळी संस्था व सहगामी ग्रुप हयांच्या संयुक्त विद्यमाने सेलेस्टियल सिटी रावेत या ठिकाणी हा उपक्रम सकाळी 12 ते 2 या वेळेत संपन्न झाला. अश्याप्रकारचा हा चौथा उपक्रम घेण्यात आला. यामुळे प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल याबाबत जनजागृती घेण्यात येत आहे. 

या संस्थेने केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनी तब्बल 152 किलो प्लास्टिक पिशव्या जमा केल्या. यावेळी प्रत्येक नागिरकांना रोपटे देऊन झाडे जगविण्याबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानामार्फत झाडे लावण्याची गरज सांगुन नागरिकांना सन्मान म्हणुन रोपटं देण्यात आले. यावेळी प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडु, सचिन काळभोर, संदीप रांगोळे, राहुल धानवे, पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: give plastic bags and take crops initiative