पावसाळ्यात भूजल पुनर्भरण कामाला प्राधान्य द्यावे : शेखर गायकवाड

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मंचर (पुणे) : 'राज्यातील ४२ हजार गावांचे नकाशे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वेबसाईटवर टाकले आहेत. आपल्या जमिनीतील भूगर्भात किती पाणी आहे. त्याची माहिती शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून नागरिकांना मिळणार आहे. भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पावसाळ्यात भूजल पुनर्भरण कामाला प्राधान्य देण्याचे काम मोठ्या प्रमाणात करावे.’’ असे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव व ग्रामदैवत भैरवनाथ उत्सव समिती यांच्या वतीने लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेत गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. मोहन साळी होते. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, सरपंच दत्ता गांजाळे, दत्ता थोरात, प्रवीण मोरडे, लक्ष्मणराव गांजाळे, सुरेश निघोट, हेमंत भागवत, रामदास दिवटे उपस्थित होते.
 
गायकवाड म्हणाले, 'राज्यातील भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाचे नकाशे, भूजल पातळी त्याची गुणवत्ता आदी माहिती नागरिकांना वेबसाईटवर पाहता येणार आहे. विनाकारण पाणड्याच्या नादी लागून खर्च वाया घालू नये. याखेरीज भूजल माहिती, मार्गदर्शक व सूचना, दरपत्रक आदी माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांना भूजलासंदर्भात असलेले प्रश्ने व समस्या भुजल विभागाकडे मांडता येणार असून फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियांना फॉलो करता येईल.'

माणूस व प्रॉपर्टी या विषयावर गायकवाड म्हणाले, 'भांडण हा प्रगतीतला मोठा अडथळा आहे. देशात मालमत्तेच्या वादावरून तीन कोटी ३२ लाख दावे सुरु आहेत. माणसे दिलाला शब्द पाळत नाहीत. भानगडीच्या जमिनी विकणाऱ्या टोळ्या चाकण, शिक्रापूर व मावळ तालुक्यात कार्यरत आहे. त्यातूनच होणारी भांडणे व गुन्हेगारी वाढत आहे.' गायकवाड यांनी अनेक जमिनीचे दावे चालवत असताना आलेले अनुभव विनोदी पद्धतीने सांगितल्या नंतर उपस्थितामध्ये हाशा पिकला.
 
यावेळी डॉ. साळी यांचे भाषण झाले. डी. के. वळसे पाटील यांनी शेखर गायकवाड यांचा परिचय करून दिला. अॅड बाळासाहेब बाणखेले यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव बाणखेले यांनी आभार मानले. गणेश कडलग यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Give priority to the ground water during rainy season: Shekhar Gaikwad