पुण्यात 'ग्लोबल पुलोत्सव' आठ नोव्हेंबरपासून

Global Pulotsav in Pune from November 8
Global Pulotsav in Pune from November 8

पुणे : चित्रपट, नाटक, संगीत, साहित्यविश्‍वात मुशाफिरी करणारे पु. ल. देशपांडे यांच्या वैविध्यपूर्ण आविष्कारांचा उत्सव असलेला'ग्लोबल पुलोत्सव'  8 नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे.

पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या समारोपाच्या निमित्ताने यंदाचा'ग्लोबल पुलोत्सव' 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह टिळक रस्ता, आयुका येथे पार पडले. उत्सवाचे उद्‌घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. खासदार डॉ. नरेंद्र जाधव आणि किरण व्ही. शांताराम यावेळी उपस्थित राहणार आहेत. 'पु. ल. परिवारा'च्या सहयोगाने' आशय सांस्कृतिक', 'स्वेअर 1', 'पिनॅकल ग्रुप', दि कॉसमॉस बॅंक', ' कोहिनूर' आणि 'एन. के. जी. एस. बी. को-ऑप. बँक लि.' यांचा संयोजनामध्ये सहभाग आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी'आशय सांस्कृतिक'चे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार,'स्वेअर 1' चे नयनीश देशपांडे, मयूर वैद्य,'पिनॅकल ग्रुप'चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजेंद्र पवार,'दी. कॉसमॉस को-ऑप. बँक लि.'चे संचालक राजीव साबडे,'कोहिनूर ग्रुप'चे कृष्णकुमार गोयल, आयुकाचे सुह्यद मोरे यावेळी उपस्थित होते.

मुलाखती, परिसंवाद, संगीत, विनोदी कार्यक्रम आणि अभिवाचन यासह 'पुलोत्सवा'मध्ये विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया यांना 'पु. ल. स्मृती सन्मान', ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'पुलोत्सव जीवनगौरव', रेणू दांडेकर यांना 'पुलोत्सव कृतज्ञता सन्मान', अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना 'तरुणाई सन्मान' तर अभिनेते शरद पोंक्षे यांना या वर्षीचा विशेष सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.

आठ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता 'पु. ल.- एक संचित', नऊ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता 'भा.डि.पाचे वल्ली', 10 नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता 'पुलकित गाणी' आणि 11 नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता 'आमचे पी. एल' आदी कार्यक्रम बालगंधर्व याठिकाणी पार पडतील. तर 11 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता 'पु. ल. नावाचे गारूड' मसाप येथे होणार आहे. 'पुलोत्सव'चे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. त्यांच्या प्रवेशिका मंगळवार (ता. 5) पासून बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध होतील, असे चित्राव यांनी सांगितले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com