मेंढपाळाच्या वाड्यावर वन्यप्राण्याचा भयंकर हल्ला

patas
patas

पाटस (पुणे) : दौंड तालुक्यातील पाटस येथे अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मेंढ्यांच्या सात कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पावसामुळे घटनास्थळी ठसे आढळून न आल्याने नक्की कोणत्या प्राण्याने हा हल्ला केला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, लांडग्याच्या कळपाने हा हल्ला केला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा
    
पाटस येथील पाटस-दौंड रस्त्याच्या पूर्व बाजूला नाना बाळू नानवर यांचे शेत आहे. शेतात त्यांचा मेंढ्यांचा वाडा आहे. काल सकाळी मेंढपाळ मेंढ्याना चरण्यासाठी इतर ठिकाणी घेऊन गेले होते. त्यावेळी मेंढ्या व शेळ्यांच्या पिल्लांना एका वाघरीत सोडले होते. सायंकाळी उशिरा मेंढ्या घेऊन परतल्यानंतर नाना नानवर व इतर मेंढपाळांना वाघरीतील सात कोकरे मृत अवस्थेत आढळली. यामध्ये शेळ्यांच्या काही करडांचा समावेश आहे.

वाघरीची जाळी पूर्णतः तुटली होती. शिवाय इतरत्र रक्ताचा सडा व कोकरांचे तुटलेले अवयव छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडले होते. एका अज्ञात वन्यप्राण्यांनी वाघर तोडून कोकरांवर हल्ला केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी चैतन्य कांबळे, वनरक्षक पद्मिनी कांबळे, वनकर्मचारी भरत शितोळे, अरुण मदने, बाबासाहेब कोकरे, रासपचे राज्याचे उपप्रदेश अध्यक्ष दादा केसकर, प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब नानवर यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनाधिकारी कांबळे यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन परिसरात लांबवर वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे शोधले. मात्र, पावसाची संतधार असल्याने ते आढळून आले नाही. त्यामुळे नक्की कोणत्या प्राण्याने हा हल्ला केला, याबाबत खात्री होऊ शकली नाही. त्यानंतर मृत कोकरांचा पंचनामा करण्यात आला.
   
याबाबत बाळासाहेब नानवर म्हणाले की, कोकरांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळाचे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाच्या वतीने त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी.  वनपरिमंडल अधिकारी चैतन्य कांबळे म्हणाले की, घटनेचा पंचनामा केला आहे. प्रथमदर्शी हा लांडग्यांचा हल्ला दिसून येत आहे. संबधित मेंढपाळांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न केला जाईल. मेंढपाळ व शेकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com