सोन्याची बिस्किटे चोरणारा कामगार पोलिसांच्या सापळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

सराफी व्यावसायिकाकडील कामगाराने मुंबईतील त्याचे मित्र व नातेवाईकांकडे ठेवलेले सव्वा कोटी रुपयाची सोन्याची बिस्किटे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली.

पुणे - सोन्याची बिस्किटे चोरीचा कामगारानेच बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस आला. सराफी व्यावसायिकाकडील कामगाराने मुंबईतील त्याचे मित्र व नातेवाईकांकडे ठेवलेले सव्वा कोटी रुपयाची सोन्याची बिस्किटे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली.

हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि गुन्हे शाखा एक, दोन व तीनच्या पथकाने ही कारवाई केली. मुख्य सूत्रधारासह मुंबई येथील तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बनाव करून लंपास केलेला सर्व सोने हस्तगत करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त समीर शेख, पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सीताराम मोरे, हिंजवडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरूण वायकर, निकम यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: The gold biscuit stealer is caught by the police