पुणे : सोन्याची मागणी घटली

देशात सोन्याची मागणी वर्षभर एकाच पातळीला नसते. ती वर-खाली होत असते. मात्र यंदा फेब्रुवारी आणि मार्चमधील विक्री ४० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
Gold
GoldSakal
Summary

देशात सोन्याची मागणी वर्षभर एकाच पातळीला नसते. ती वर-खाली होत असते. मात्र यंदा फेब्रुवारी आणि मार्चमधील विक्री ४० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

पुणे - कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेली स्थिती, गेल्या महिनाभरात वाढलेले दर आणि रशिया-युक्रेन युद्धाचा (War) आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला परिमाण यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये सोन्याची मागणी (Gold Demand) घटली आहे. या दोन महिन्यांत सुमारे ४० टक्क्यांनी खरेदी कमी झाली आहे.

देशात सोन्याची मागणी वर्षभर एकाच पातळीला नसते. ती वर-खाली होत असते. मात्र यंदा फेब्रुवारी आणि मार्चमधील विक्री ४० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. याउलट कोणत्याही अल्पकालीन परिस्थितीत बड्या गुंतवणूक संस्थांचा विविध देशांच्या चलनावरील विश्‍वास उडतो व ते सोनेखरेदीच्या मागे लागतात. त्यातून सोन्यातील गुंतवणूक वाढते. तसेच चीन आणि रशियाकडून सोन्याचा डॉलरशी असलेला कनेक्ट तोडून केवळ गोल्ड बॅक चलनाची कनेक्ट ठेवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्यात यश येण्याकरता चीन आणि रशियाकडून सरकारी स्तरावर सोन्याची खरेदी वाढत आहे, अशी माहिती पी. एन. गाडगीळ आणि सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी दिली.

अमेरिकेतून आर्थिक डेटा आल्यानंतर त्याचा परिमाण सोन्याचा दरावर कायमच होत असतो. तसेच तेलाचे भाव महागले आहे. त्यामुळे इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. जीवनावश्‍यक बाबींचे दर वाढल्याने चलनवाढ होते व त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. त्यामुळे आता सोने महागल्याचे दिसते, असे मोडक यांनी सांगितले.

Gold
नागरीकांचा वेळ वाचविण्यासाठी पुणे वाहतुक पोलिसांकडून उपाययोजना

तर भाव स्थिरावतील

भाव वाढायला लागले की ते आणखी वाढण्याच्या आत खरेदी करू, अशी सामान्यांची मानसिकता असते. दीर्घकाळ जर असेच दर राहिले तर त्याची खरेदी सुरू होर्इल. त्यामुळे सोन्याचा बाजाराला पुन्हा झळाळी येर्इल. तसेच सोन्याचे भाव सध्याच्या दराच्या आसपास स्थिरावतील, अशी शक्यता मोडक यांनी व्यक्त केली.

महत्त्वाचे मुद्दे...

  • युद्ध थांबले तरी किमान सहा महिने अर्थव्यवस्थेवरील वाईट परिमाण दिसतील

  • महागलेले दर लगेच कमी होणार नाहीत

  • चलनवाढीवर होणारा परिणाम चलन कमकुवत करेल व त्यामुळे सोन्याचे दर वाढतात

  • गेल्या महिन्यात सोन्याचे दर पाच हजार रुपयांनी वाढले

  • अमेरिकेतून आर्थिक डेटा आल्यानंतर त्याचा परिमाण सोन्याचा दरावर सतत होतो

  • न टाळता येणाऱ्या कारणांमुळे सोन्याची खरेदी वाढेल

आता तात्पुरती खरेदी थांबली असली तरी दर स्थिरावले की पुन्हा खरेदी सुरू होईल. दोन ते तीन महिने हाच दर राहिला तर खरेदी नक्की वाढेल. पुढील चार महिन्यांत ज्यांच्या घरात लग्न आहे, ते गुढीपाडवा आणि अक्षयतृतीयेला मुहूर्त म्हणून सोने खरेदी करू शकतात. या दोन सणांमुळे खरेदी टळणार नाही, तसेच सोने हे शाश्‍वत आहे. दीर्घकालीन विचार करता त्यात वाढच होत राहते.

- अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पी. एन. गाडगीळ आणि सन्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com