esakal | दोन महिन्यांनंतर पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर दागिन्यांची झळाळी

बोलून बातमी शोधा

gold.jpg

लक्ष्मी रस्त्यासह सदाशिव पेठ, नारायण पेठेतील सर्व सुरळीत झाल्याचे दिसून आले. टिळक रस्त्यावरची दुकाने मात्र बंद होती. तर त्यालगतचा शास्त्री रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती.

दोन महिन्यांनंतर पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर दागिन्यांची झळाळी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या धास्तीने गेली दोन महिने 'शटरडाऊन' झालेल्या आणि नूर पालटलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील बाजारपेठ बुधवारी झळाळली ती सराफ दुकानांतले दागिने आणि त्यावरच्या दिव्यांनी.. या रस्त्यावरच्या बहुतांशी सराफ व्यावसायिकांनी दुकाने उघडली; तर काही ठिकाणी कपड्यांची विशेषत गाड्यांची शोरूम खुली झाली; कुमठेकर रस्त्यांवरचीही दुकाने सकाळीच सुरू झाली. परिणामी, शहरातील मुख्य बाजारपेठ अनेक दिवसांनी गजबजल्याचे चित्र होते. काही छोट्या दुकानदारांनीही व्यवसाय सुरू केला.

....म्हणून यूपीतील चित्रकुट येथील महिलेने पुणेकरांचे मानले आभार

त्याचवेळी लक्ष्मी रस्त्यासह सदाशिव पेठ, नारायण पेठेतील सर्व सुरळीत झाल्याचे दिसून आले. टिळक रस्त्यावरची दुकाने मात्र बंद होती. तर त्यालगतचा शास्त्री रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती, लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यांत पुण्यातील बाधित क्षेत्र वगळता अन्य भागीतल व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठीचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, कोणत्या दिवशी, कोणती दुकाने सुरू राहातील, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी म्हणजे, बुधवारी नेमके काय सुरू होणार याची पुणेकरांत उत्सुकता आहे.

पुण्यातील ८० वर्षांच्या आजीबाई जिंकल्या कोरोना विरूध्दची लढाई

तेव्हा बुधवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावर व्यापारी आणि त्यांच्याकडील कामगारांची वर्दळी दिसून आली. दहा-साडेदहा वाजल्यापासून काही दुकानांचे शटर उघडण्यात आले. त्यात सर्वाधिक दुकानेही सराफ व्यावसायिकांची होती. त्यामुळे गेल्या ५६ दिवसांपासून बंद राहिलेल्या येथील बाजारपेठ झळाळी मिळाल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर अन्य काही दुकाने उघडतील, याची शक्यता होती. मात्र ती सुरू झाली नाही. तरीही दुकानांभोवती कामगारांची गर्दी होती.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दरम्यान, एका रस्त्यावरची तीही एका बाजुची पाचच दुकाने उघडी राहतील, असे महापालिकेने आदेशात म्हटले आहे. मात्र, एवढ्या लांबीच्या लक्ष्मी आणि कुमठेकर रस्त्यांवर नेमकी कोणती दुकाने सुरू करायची? याचा गोंधळ होता, तर सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेत भाजी विक्रेते आणि खाद्यपदार्थ स्टॉल सुरू झाल्याने त्याठिकाणी गर्दी होती. गेले काही  दिवस दुकाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात सफाई करावी लागणार आहे. त्यामुळे बाजारपेठ नियमित सुरू होण्यास आणखी चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.