सुवर्णपदक विजेता रोहित चव्हाणने घेतली राज ठाकरे यांची भेट

राजकुमार थोरात
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भाला फेकस्पर्धेमधील जागतिक सुवर्णपदक विजेता रोहित भारत चव्हाण यांनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी रोहितला भाला फेक स्पर्धेसाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. 

गेल्या महिन्यामध्ये रोहित याने  दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेत भालाफेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटावून देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. बुधवारी (ता. 10) मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांच्या सहकार्याने  इंदापूर तालुका मनसेचे अध्यक्ष संतोष भिसे यांच्यासह रोहितने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेट घेतले. यावेळी ठाकरे यांनी रोहितच्या कार्याचे कौतुक केले.

ग्रामीण भागातील गरीब कुंटूबातील मोलमजुरी करणाऱ्या रोहित मिळवलेले नेत्रदीपक यश युवकांसाठी प्रेरणादायी अाहे. मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी सहकार्य करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगून मनसेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, रेल्वे कर्मचारी सेनेचे जितेंद्र पाटील, अॅड.भार्गव पाटसकर, अॅड.पी.सूर्यवंशी, अॅड.निलेश वाबळे, सागर पाटसकर, इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष भिसे, रामभाऊ काळे, प्रशांत पवार, प्रदीप रकटे, वैभव खरात, दीपक वाघ,धनंजय थोरात, अजीज पत्तेवाले उपस्थित होते.

Web Title: gold medal winner rohit chavhan meets raj thackeray