सुवर्णपदक विजेता रोहित चव्हाणचा सत्कार...

सुवर्णपदक विजेता रोहित चव्हाणचा सत्कार...

वालचंदनगर : दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भाला फेक मध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या रोहित भारत चव्हाणचे कळंब (ता. इंदापूर) येथे तोफांच्या सलामी स्वागत करण्यात आले. दक्षिण कोरियामध्ये नुकतीच 13 वी  जागतिक पातळीवर फायर फायटर्स स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील जगातील 63 देशातीलखेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रोहित चव्हाण याने भालाफेक स्पर्धेमध्ये 68 मीटर लांब भाला फेकुन सुवर्णदपदक पटकावले.

शुक्रवारी (ता.22) रोजी रोहित याचे कळंब गावामध्ये आगमन झाले. आगमन होताच गावकऱ्यांनी तोफांच्या सलामीने स्वागत करुन गावामधून भव्य मिरवणुक काढण्यात आली. अंथुर्णे मधील नागेश्‍वर तरुण मंडळाच्या वतीने आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या  हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी  भरणे  यांनी सांगितले की, रोहित ने अत्यंत गरीब परिस्थितीमधून मिळवले यश  प्रेरणादायी असल्याचे सांगून युवकांसाठी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ध्येय गाठण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी सरपंच तानाजी शिंदे, नाना पाटील, माजी उपसरपंच राघू गायकवाड उपस्थित होते. रोहित चव्हाण हा कळंब मधील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. आज (शनिवार) रोजी महाविद्यालयामध्ये रोहितचा सत्कार जिल्हा परिषदेचे  बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माने यांनी सांगितले की, रोहितने इंदापूरचे नाव जगामध्ये चमकवले आहे. आत्मविश्‍वास हा विजयाचा शिल्पकार असतो. 

यशस्वी होण्यासाठी मनावरती नियंत्रण असणे गरजेचे असते. युवकांनी कोणत्याही गोष्टीला आत्मविश्‍वासाने सामोरे जावून यशस्वी होण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्षीय प्रतिनिधी  व राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाचे उपाध्यक्ष   वीरसिंह रणसिंग, योगेश डोंबाळे, विश्‍वस्त प्रकाश कदम, प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, शिवाजी कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले.

रोहितला मदतीची गरज...

सुवर्णपदक विजेता रोहित चव्हाण याची  घरची परस्थिती अतिशय नाजुक आहे. वडील गवंडी काम व आई मजूरी करते. रोहितला चांगल्या भाल्याची गरज असल्याने विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयातर्फे चांगल्या दर्जाचा भाला भेट देणार असल्याचे वीरसिंह रणसिंग यांनी  सांगितले. रोहितला भालाफेक मध्ये  करिअर करण्यासाठी अनेक हातांच्या मदतीचे गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com