दोन लाख किंमतीचे सोन्याचे दागिने महिलांच्या टोळीने चोरले

Gold ornaments worth Rs two lakh stolen from womens gang at manchar pune
Gold ornaments worth Rs two lakh stolen from womens gang at manchar pune

मंचर : पुणे ते साक्री एसटी बसमधून प्रवास करत असताना मंचर (ता. आंबेगाव) येथील प्रतिभा पंढरीनाथ थोरात (वय ५०) यांच्या पिशवीतील दोन लाख किमतीचे सोन्याचे दागिने महिलांच्या टोळीने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी प्रतिभा यांचे पती पंढरीनाथ थोरात यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 
 
नाशिक फाटा येथून थोरात दांपत्य एसटी बसमध्ये बसले. मंचर येथे लग्न समारंभाला उपस्थित राहायचे होते म्हणून प्रतिभा यांनी सोन्याची चैन, अंगठी, कुड्या व मंगळसूत्र असे एकूण दहा तोळे वजनाचे दागिने डब्यात ठेवून कातडी पिशवीमध्ये डबा ठेवला होता. चाकण राजगुरुनगर मार्गे मंचरला एसटीतून उतरल्यानंतर थोरात दाम्पत्य पाटीलवाडा (मंचर) येथे घरी गेले. त्यावेळी सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत पंढरीनाथ थोरात म्हणाले, ''चाकण येथे एसटी गाडीत चार महिला बसल्या त्यांनी मंचरचे तिकीट काढले होते. त्यापेकी दोन महिला प्रतिभा यांच्या जवळ बसल्या. त्यापैकी एका महिलेकडे असलेले लहान मुल रडत होते. अन्य दोन महिला प्रतिभा यांच्या समोर उभ्या होत्या. त्यांनीच चोरी केल्याचा संशय आहे. या चारही महिला मंचरच्या अलीकडे अवसरी फाट्यावर एसटीतून खाली उतरल्या होत्या. मध्यमवयीन व कन्नड भाषेत त्या बोलत होत्या. अश्या पद्धतीने या पूर्वी एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने लांबविण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. सराईत महिला टोळीला जेरबंद करण्यात पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. याबाबत पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा कुटुंबासह उपोषणाला पोलिस ठाण्यासमोर बसावे लागेल.''
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com