सोन्याच्या अंगठ्या विकणारा आळंदीतील सराफही अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

आळंदी - मतदारांना पैसे वाटण्याच्या तयारीत असणाऱ्या आळंदीतील गरुड पितापुत्रा मागे आता निवडणूक आयोग, पोलिस आणि आयकर विभागाचा ससेमिरा लागला आहे. शहरातील एका सराफाकडून सोन्याच्या अंगठ्या विकत घेतल्याने त्याचीही आता चौकशी होणार असल्याचे आळंदी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले. 

आळंदी पोलिसांनी बुधवारी (ता. ७) मारलेल्या छाप्यात माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड (वय ७२) आणि प्रभाग सहामधील अपक्ष उमेदवार प्रदीप गरुड (वय ३२) यांना दोन लाख साठ हजार रुपयांसह ४१ सोन्याच्या अंगठ्या जवळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. दोघांकडेही चलनातून बाद केलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा होत्या. दोघांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवून नोटीस देऊन सोडून दिले. मात्र, आळंदीतील एका स्थानिक सराफाकडून सोन्याच्या अंगठ्या खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. या व्यापाऱ्याच्या नावावर सुमारे पाच लाख ९२ हजार रुपये गरुड कुटुंबाकडून जमा झाल्याचे आळंदी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.

पोलिस तैनात
सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीत चार ठिकाणी नाकाबंदीसाठी पोलिस तैनात ठेवले आहेत. यासाठी तीन पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, चाळीस पोलिस असा बंदोबस्त ग्रामीण पोलिसांच्या वतीने निवडणूक काळात आळंदीत ठेवण्यात आला आहे. 

Web Title: gold ring sailing jewellers in problem