विमानतळावर 28 लाखांचे सोने जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे - पॉलिमर आणि प्लॅस्टिसायजरचा वापर करून पेस्टरूपात सोने तस्करी करणाऱ्या चेन्नई येथील नागरिकाला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोहगाव विमानतळावर रविवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे 28 लाख रुपये किमतीचे 925 ग्रॅम सोने जप्त केले आहे.

पुणे - पॉलिमर आणि प्लॅस्टिसायजरचा वापर करून पेस्टरूपात सोने तस्करी करणाऱ्या चेन्नई येथील नागरिकाला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोहगाव विमानतळावर रविवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे 28 लाख रुपये किमतीचे 925 ग्रॅम सोने जप्त केले आहे.

सोन्याची तस्करी रोखण्यासाठी लोहगाव विमानतळ येथे सीमा शुल्क विभागाचे अधिकारी सातत्याने कारवाई करीत आहेत. तस्करी करणाऱ्यांकडून वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. घन स्वरूपातील सोन्याची तस्करी शोधण्यात अडचण येत नाही. मात्र, पेस्ट स्वरूपातील सोन्याची तस्करी शोधण्यात अडचण येते. अशीच एक तस्करी सीमा शुल्क विभागाने पकडली.

मोहम्मद साफीर उमर सोवबार असे या अटक आरोपीचे नाव आहे. तो काल चेन्नई येथून दुबईला गेला होता. लगेच दुसऱ्याच दिवशी तो भारतात परतला. तो चेन्नई येथे न जाता पुण्यातील लोहगाव विमानतळ येथे उतरला होता. त्यामुळे संशय बळावला होता, त्या आधारे त्याची तपासणी केली गेली अशी माहिती उपायुक्त भारत नवले यांनी दिली. त्याच्याकडील "नी कॅप'मध्ये पेस्ट आढळून आली. ही पेस्ट सोन्याची असल्याचे आढळून आले. अशाप्रकारे सोन्याची तस्करी करण्याचा चौथा प्रकार उघड करण्यात सीमा शुल्क विभागाला यश आले आहे. याच प्रकारची आणखी एक कारवाई सीमा शुल्क विभागाने केली असून, सात परदेशी नागरिकांकडून सुमारे 1 लाख 64 हजार रुपये किमतीच्या पाइन ब्रॅंडच्या सिगारेटचे 821 बॉक्‍स जप्त केले आहेत. या परदेशी नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Web Title: gold seized crime