माथाडी कामगार कायद्याचा शासकीय पातळीवर सुवर्ण महोत्सव व्हावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - महाराष्ट्र माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार कायद्याला येत्या पाच जूनपासून पन्नासावे वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त हमाल मापाडी महामंडळ सुवर्ण महोत्सव साजरे करणार आहे. या कायद्यामुळे राज्यातील कष्टकरी जनतेला न्याय मिळाल्याने शासकीय पातळीवर सुवर्ण महोत्सव साजरा करावा, अशी मागणी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी सुभाष लोमटे उपस्थित होते. 

आढाव म्हणाले, ""देशातील असुरक्षित व असंघटित वर्ग या कायद्याने एकत्रित आला. देशातील कष्टकरी वर्गाला हक्क, सवलती, संरक्षण देणारा पहिला कायदा अस्तित्वात आला. भारतात कामगारांची संख्या जास्त असल्याने हा कायदा देशभरात लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच, राज्यातील विविध माथाडी मंडळांसमोर माथाडीतून पहिला पगार घेणाऱ्या ज्येष्ठ हमालांचा सत्कार केला जाणार आहे.'' 

Web Title: Golden Jubilee of the Mathadi Labor Law Governmental level says baba adhav