गोळेगाव, बारव व जुन्नरला फुल टू स्मार्ट विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दत्ता म्हसकर
सोमवार, 2 जुलै 2018

बारव ता. जुन्नर येथील प्राथमिक विद्यामंदिरामध्ये 'सकाळ'च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या फुल टू स्मार्ट या उपक्रमाबाबत बोलताना ढोबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

जुन्नर - जुन्नर, बारव, गोळेगाव येथील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांनी 'सकाळ'च्या फुल टू स्मार्ट उपक्रमास सहभाग घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
     ‎ 
"शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये 'सकाळ'चे योगदान उल्लेखनीय आहे." फुल टू स्मार्ट सारख्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती उंचावण्यास मदत होत असल्याची भावना मुख्याध्यापक राजेंद्र ढोबळे यांनी व्यक्त केली. बारव ता. जुन्नर येथील प्राथमिक विद्यामंदिरामध्ये 'सकाळ'च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या फुल टू स्मार्ट या उपक्रमाबाबत बोलताना ढोबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  
                 
'सकाळ'चे वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक दीपक महाडिक, बातमीदार दत्ता म्हसकर, मिननाथ पानसरे, शिक्षक एन. एच. माळी, विवेक हिंगे यांसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. जुन्नर शहर व परिसरातील अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर, शंकरराव बुट्टे पाटील मराठी व इंग्रजी विद्यालय, प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय, प्लॅनेट एंजल स्कुल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोळेगाव येथे विद्यार्थ्यांनी फुल टू स्मार्ट या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Golegaon Barve and Junnar full to smart students spontaneous response