जुन्नर : गोळेगावला विजयी उमेदवारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

जुन्नर : गोळेगावला विजयी उमेदवारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

जुन्नर : जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून मिरवणूक काढल्याप्रकरणी गोळेगाव (ता. जुन्नर) येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण दहा जणांच्या विरोधात जुन्नर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

याबाबत  पोलीस कॉन्स्टेबल नितीन लोहकरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हर्षल विजय जाधव, गुलाब भालचंद्र लोखंडे, अर्चना राजेंद्र ताम्हाणे, लता तुकाराम बिडवई, शिवाजी मारुती घोगरे , अरविंद चंद्रकांत बिडवई, संजय गंगाराम खंडागळे, गणपत सोनू आधाण, शांताराम विश्वास जाधव , सुनिता विठ्ठल मोधे सर्व रा. गोळेगाव व इतर दहा ते बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोमवार (ता. १८) रोजी दुपारी लेण्याद्री रस्त्यावरील ठाकरवस्ती समोर ही घटना घडली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची रॅली सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com