कलेद्वारे गोंधळ्यांची दिवाळी

gondhali
gondhali

टाकळी हाजी (पुणे) : दिवाळी सणाला विद्युत रोषणाई व फटाक्यांच्या आतिषबाजीने नवीन व्यवसायाची सुरूवात असो की नवीन गृहप्रवेश दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधला जातो. मात्र कवठे येमाई (ता. शिरूर) येथे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाघ्या व गोंधळी समाजातील कलाकार घरोघरी जाऊन आपली कला सादर करत आगळीवेगळी दिवाळी सादर करतात. 

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात पाडवा सण वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. पहाटेच्या मुहूर्तावर व्यापारी मंडळीआपल्या वही पूजनाबरोबर फडाकड्याच्या आतीषबाजीने करतात. त्यामुळे पहाटेपासून मंगलमय वातावरण तयार झालेले असते. कवठे येमाई (ता. शिरूर) येथे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाघ्या व गोंधळी समाजातील कलाकारांचा वेगळाच मुहूर्त असतो. या दिवशी आपल्या कलागुणांतून जगदंबेच्या कथेची गाणी सादर करतात. त्या पाठोपाठ समाज प्रबोधन गीते सादर करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. त्यापासून त्यांना चांगली बिदागी मिळते. देवाच्या गुणगाणाने व दिवाळीच्या मंगलमय वातावरणात व्यवसायिक व नागरीक दान करण्यासाठी तयार असतात. या परंपरेने दिवाळी सणात दुकानात किंवा घरात देवाचे गुणगान करणाऱ्या कलाकारांना अधिक महत्व प्राप्त झालेले दिसून येते.

चला जाऊ कवठे गावाला, येमाई देवीला... जगदंबेचा उदो उदो बोला या गिताला अधिक मागणी असते. आईचे महत्व, दारूबंदी, किंवा कुटूंब नियोजन सारख्या समाज प्रबोधनात्म गिते देखील सादर केली जातात. असे कलाकार दिवाळीत आपली लोकपंरपंरा जतन करण्यासाठी काम करताना दिसतात. खंजीरी, तुणतुणे, संबळ, भंडारी, कोटमा, टाळ या साहित्यांचा वापर करून ही मंडळी देवीचे गुणगाऩ करणारी गाणी गाताना दिसतात. दिवाळीच्या पाडव्याला या गितांचा कार्यक्रम सादर केला तर वर्षेभर जागरण गोधंळाचे कार्यक्रम करण्याची संधी मिळून त्यातून देखील त्यांना चांगली बिदागी मिळते. 

चार पिढ्यांपासून ही परंपरा जतन करण्याचे काम करण्यात आले आहे. गोंधळी व वाघ्या ही कला सादर करत असताना देवीच्या गुणगानावर अधिक भर दिला जातो. समाजात या कलेला अधिक महत्व प्राप्त होण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी बरोबर जुनी लोकगिते समोर आली पाहिजे असे गोंधळी राजेंद्र रेणके यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com