‘गुड अँड सिंपल टॅक्‍स’ बनविणार - कृष्णा मिश्रा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) सर्वांच्या सोयीसाठी आहे. त्यामध्ये सुधारणेला जरुर वाव असून, त्यासाठी जीएसटी परिषद नियमित बैठका घेऊन त्याला ‘गुड अँड सिम्पल टॅक्‍स’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षांत सनदी लेखापाल (सीए) अनेक महत्त्वाच्या सेवा पुरवीत आहे. या सर्वांमुळे जीएसटी संकलनात मोठी वाढ झाली, असे प्रतिपादन जीएसटीच्या मुख्य आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले.

पुणे - वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) सर्वांच्या सोयीसाठी आहे. त्यामध्ये सुधारणेला जरुर वाव असून, त्यासाठी जीएसटी परिषद नियमित बैठका घेऊन त्याला ‘गुड अँड सिम्पल टॅक्‍स’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षांत सनदी लेखापाल (सीए) अनेक महत्त्वाच्या सेवा पुरवीत आहे. या सर्वांमुळे जीएसटी संकलनात मोठी वाढ झाली, असे प्रतिपादन जीएसटीच्या मुख्य आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने जीएसटीवर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कोथरूड येथील एमआयटीमध्ये झालेल्या या परिषदेला राजीव कपूर, ‘सीए’ अतुल गुप्ता, चंद्रशेखर चितळे, ऋता चितळे, सुशीलकुमार गोयल, राजेंद्रकुमार, यशवंत कासार, आनंद जाखोटिया, समीर लड्डा, अभिषेक धामणे, काशिनाथ पठारे, यशवंत कासार आदी उपस्थित होते. 

या वेळी कपूर म्हणाले, ‘‘ऑनलाइन जीएसटी भरण्यात तक्रारी येत आहेत. त्यांना त्वरित मदत करीत आहोत. जीएसटी भरणा करून करदात्यांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. बोगस जीएसटी बिल काढण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यांना पकडणे शक्‍य आहे.’’

गुप्ता म्हणाले, ‘‘देशाच्या विकासात; तसेच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांमध्ये मध्यस्थ म्हणून ‘सीए’ची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा मेळ घालत अभ्यासक्रम अद्ययावत केला जात आहे. नियमित मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा घेऊन ‘सीए’ अधिकाधिक प्रगल्भ होईल, यावर भर दिला जात आहे.’’

‘सीए’ हे जीएसटी अधिक सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात आणून देत योग्य त्या सुधारणा करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good and simple tax krushna mishra