चित्रपटाच्या माध्यमातून चांगला मानव घडविणे शक्य : समर नखाते

चित्रपटाच्या माध्यमातून चांगला मानव घडविणे शक्य : समर नखाते

पुणे : चित्रपट म्हणजे चलचित्राच्या माध्यमातून कथा सांगणे. याची निर्मिती प्रक्रिया जेवढी त्रासदायक व गुंतागुंतीची आहे, ती तेवढीच समजून घेण्यासाठी सोपी व सुंदर कलाकृती आहे. चित्रपटाच्या माध्यमातून माणसांमध्ये संवेदनशीलता जागवून त्याला चांगले घडविणे शक्य असल्याचे मत चित्रपट समीक्षक समर नखाते यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित केलेल्या आठव्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बाेलत होते. यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेते विक्रम गोखले, आनंदी गोपाळ चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विध्वंस, माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागाच्या प्रमुख डॉ. माधवी रेड्डी भाग्यश्री मिलिंद, ललित प्रभाकर, भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उपसंचालिका किर्ती तिवारी उपस्थित होते.

नखाते म्हणाले, ‘‘कॅमेरा हा मानवनिर्मित यंत्र असून, तो अवकाश आणि काळाला स्पर्श करतो. कॅमेरा हा मानवाचा तिसरा डोळा आहे. चित्रपट हे व्यवसाय, यंत्र आणि कला याची सांगड घालते. त्यामुळे चलचित्र माध्यम हे माणसाचे विश्‍व विशाल व समृध्द करते.’’

शिकणे हा माणसाचा ध्यास असून, शिकणे आणि शिकविणे ही अमर्याद प्रक्रिया असल्याचे गोखले यांनी सांगितले. तर विध्वंस म्हणाले, ‘‘आनंदी गोपाळ हा चित्रपट भाषेच्या आणि संस्कृतीच्या सौर्द्यासोबत दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आनंदी जोशी यांच्या काळ आणि कर्तत्त्वाचा ठसा या चित्रपटात पाहायला मिळतो. 132 वर्षांपूर्वी समाज कोठे होता आणि आज समाज कुठपर्यंत पोहचला आहे याची शंका आहे.’’ 

चित्रपट क्षेत्रातल्या पहिल्या महिला तंत्रज्ञ असणाऱ्या सरस्वती फाळके यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'सरस्वती' पुरस्कार आनंदी जोशी यांची भूमिका करणाऱ्या भाग्यश्री मिलिंद यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रांजल सातव व ऋतिका आपटे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com