मळद गावातील ग्रामस्थांसाठी दिलासादायक बातमी

सावता नवले
Sunday, 13 September 2020

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरमध्ये तीन दिवसात मळद  येथील 33 जणांनी घशातील नमुने कोरोना तपासणीसाठी दिले होते. त्यापैकी एकच अहवाल पॉझिटिव्ह तर 32 अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरमध्ये तीन दिवसात मळद  येथील 33 जणांनी घशातील नमुने कोरोना तपासणीसाठी दिले होते. त्यापैकी एकच अहवाल पॉझिटिव्ह तर 32 अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मळद येथील दोन व्यक्तींचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याने  व संपर्कातील 11 तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत नोकरीस जाणारा एक जण असा एकून 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामळे रूग्णांची संख्या आणखी वाढेल अशी भिती ग्रामस्थांमध्ये होती. मात्र सुदैवाने  बुधवारी तपासणी केलेल्या 12 पैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह तर 11 निगेटिव्ह आले. तर गुरूवारी 15 जणांनी तपासणीसाठी नमुने दिले होते. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आहे.

तसेच शुक्रवारी (ता. 11)  6 जणांनी घशातील नमुने तपासणीसाठी दिले होते. त्यांचे आज ( ता. 12 ) उशिरा अहवाल प्राप्त झाले असून सर्व निगेटिव्ह आले आहेत. ही साखळी तुटल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये हलविणे बंधनकारक आहे. तर  निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींनी 14 दिवस विलगिकरणात राहणे गरजेचे असताना मळदमध्ये शासनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

निगेटिव्ह रूग्णांनी घराबाहेर न पडता 14 दिवस विलगिकरणात राहावे. तसेच मास्क वापरणे, सोशल डिस्टिंक्शन ठेवावे, वारंवार हात धुणे, गर्दी करून बसणे टाळावे. कोणाला काही त्रास झाल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन  डॉ. बोऱ्हाडे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष​

रावणगाव येथील खासगी रुग्णालयातील डॉ.  प्रफुल्ल बिडवे म्हणाले, आमच्या दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रूग्णांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे अढळून आल्यास कोरोना तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र रूग्ण घाबरून तपासणी करण्यास टाळाटाळ करून घरीच उपचार घेतात. मात्र जास्त त्रास झाल्यानंतर तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रूग्णांनी न घाबरता लगेच तपासणी करून घेऊन उपचार घ्यावेत असे आवाहन डाॅ. बिडवे यांनी केले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for the villagers of Malad village

Tags
टॉपिकस
Topic Tags: