Pune News: खूशखबर! वाघोली, लोहगावचा पाणी प्रश्न सुटणार; पाणी पुरवठा योजना जाहीर

महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Water Supply
Water Supply

पुणे : वाघोलीतील नागरिक पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी झगडत असताना या भागाला समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी देण्यासाठी डीपीआर तयार केला आहे. वाघोलीसह लोहगावचाही यामध्ये समावेश आहे. या दोन्ही गावांना भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध केले जाणार असून २८१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी ही माहिती दिली. (Good news Water problem of Wagholi Lohgaon will be solved Water supply plan announced)

Water Supply
Ayaan Goel: पठ्ठ्या दहाव्या वर्षी पास झाला दहावीची परीक्षा! घडवला इतिहास

पुणे महापालिकेत २०२१ मध्ये वाघोली गावाचा समावेश झाला आहे. या भागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक मोठे बांधकाम प्रकल्प झाले असले तरी तेथील नागरिक पाणी, रस्ता यासह पायाभूत सुविधांसाठी झगडत आहेत. पूर्वी ग्रामपंचायतीकडून पाणी दिले जात होते, पण तो अपुरा असल्याने येथील नागरिक टँकरवर अवलंबून आहेत. त्यामध्ये त्यांची लूट होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत.

Water Supply
MPSC Exam: भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या मुलाखती स्थगित!

महापालिकेने समाविष्ट गावांसाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्याचे काम केले आहे. यामध्ये वाघोली आणि लोहगाव (उर्वरित) दोन गावांसाठी २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून एकत्रित पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. यासाठी भामा आसखेड धरणातून रोज ५९ एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेसाठी २८१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असून, त्याचा प्रस्ताव पूर्वगणन समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असे विक्रमकुमार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com