पुणे: चार धरणांत 18 टीएमसी पाणीसाठा

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑगस्ट 2016

पुणे - पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या प्रकल्पातील धरण क्षेत्रात सोमवारपासून पाऊस पडत असून तो आता जोर पकडत आहे. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. चारही धरणांत मिळून आज (मंगळवार) सकाळपर्यंत 18 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीपेक्षा 4 टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे.
 
शहरात सुरु असलेल्या पाणी कपात धोरणानुसार 18टीएमसी पाणी शहराला किमान 15 महिने पुरेल एवढे आहे. सोमवारी सकाळी मागील 24 तासांत चार धरणांत चांगला पाऊस पडला. त्यानंतर सोमवारी दिवसभर रात्री देखील पावसाची धार दिवसभर सुरूच होती. काल दिवसभर सूर्यदर्शन झाले नव्हते. मागील 24 तासात टेमघर येथे 88, पानशेतला 54, वरसगावला 55 तर खडकवासला येथे 17 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 
 
टेमघर येथे 1 जूनपासून (62 दिवसात) सोळाशे मिलीमीटर पाऊस झाला आहे. पानशेत व वरसगाव येथे अकराशे तर खडकवासला येथे 415 मिलीमीटर पाऊस पडला आहे. टेमघर धरणात 47 टक्के, पानशेत मध्ये 71, वरसगावला 58 तर खडकवासला धरणात 63 टक्के पाणी जमा झाले आहे. धरणक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाण्यासाठ्यात वाढ होत आहे. जोर कायम राहिल्यास धरणात जमा होणार येवा वाढेल. खडकवासला धरणातून कालव्याच्या विसर्ग 1155 क्युसेक करणात आला आहे. बंद जलवाहिणीतून 325 कुसेकने पाणी सोडले जात आहे.
 
धरणाचे नाव- 24 तासातील पाऊस मिमी मध्ये/ 1 जून पासूनचा पाऊस/पाणीसाठा टीएमसीमध्ये/ पाणीसाठा टक्केवारी मध्ये
टेमघर-88/1590/1.76/47.19 
पानशेत-54/1115/7.57/71.12 
वरसगाव-55/1114/7.43/57.98 खडकवासला -17/415/1.24/62.92 
चार धरणातील एकूण पाणीसाठा- 18.00टीएमसी , 61.74 टक्के

Web Title: Good rain in all Pune water storage locations