इंदापूरच्या तालुक्यात फुल टू स्मार्टला उत्सफूर्त प्रतिसाद

राजकुमार थोरात
गुरुवार, 5 जुलै 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शाळांमध्ये ‘सकाळ’ ने सुरु केलेल्या ‘फुट टू स्मार्ट’ उपक्रमाला उत्सफुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ माध्यम समुहाने विद्यार्थ्यांसाठी फुल टू स्मार्ट उपक्रम सुरु केला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर, कळंब व जंक्शनमधील शाळांमध्ये सकाळचे बारामती कार्यालयाचे वितरणचे साहय्यक व्यवस्थापक मनोज काकडे यांनी विद्यार्थ्यांना फुल टू स्मार्टची उपक्रमाविषयी माहिती सांगितली.

शाळेतील मुलांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला असुन विद्यार्थ्याचे जनरल नॉलेज वाढणण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होत असल्याचे  वर्धमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नवनाथ जाधव, भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी चे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, पाठशाळेच्या प्राचार्य विजया वाघमारे, व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य संदीप पानसरे,नंदिकेश्‍वर विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत सोळसे,डॅफोडिल्स इंग्शिल मिडीयम स्कुलच्या संस्थापिका तेजस्विनी राणे व प्राचार्या प्रसन्ना कुलकर्णी यांनी सांगितले.

सकाळच्या उपक्रमाचे कौतुक...
सकाळ माध्यम समुह समाजासाठी विविध विधायक उपक्रम राबवित असते. सकाळ रिलीफ फंडातुन सुरु असलेली ओढा खोलीकराचे कामे, पालखी सोहळ्यामध्ये सुरु केलेला ‘साथ चल’ उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेला ‘फुल टू स्मार्ट’ उप्रकम कौतुकास्पद असल्याचे फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी सांगितले.

Web Title: good response to full to smart in indapur