बारामतीत लॉकडाऊनमुळे शुकशुकाट...!

मिलिंद संगई
Monday, 7 September 2020

बारामती शहर व तालुक्यात 180 पोलिस कर्मचारी, 12 अधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली असून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे. 

बारामती : कोरोनाचा शहर व तालुक्या उद्रेक झाल्यानंतर आजपासून बारामती शहर पुन्हा एकदा प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय झाला. या नंतर आज पुन्हा एकदा बारामती थंडावली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांनीच घरात थांबायचे असल्याने आज बारामती शुकशुकाट अनुभवण्यास मिळाला. पोलिसांनी आज शहरातील सर्व प्रमुख रस्ते बंद केलेले असून मुख्य चौकात मोठा पोलिस बंदोबस्त आहे. 
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image may contain: one or more people, tree, sky, shoes, basketball court and outdoorबारामती शहर व तालुक्यात 180 पोलिस कर्मचारी, 12 अधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली असून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून संपर्क कमी होऊन कोरोनाची लागण अधिक लोकांना होऊ नये या साठी जनता कर्फ्यूसह शहरातील सर्वच प्रभागांना प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान वैद्यकीय, दूधासह इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतलीजात असल्याचे शिरगावकर यांनी नमूद केले. 

Image may contain: sky, cloud, tree, basketball court and outdoor

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, जेणेकरुन कोरोनाचा त्यांना प्रादुर्भाव होणार नाही, जाहिर केलेले निर्बंध हे लोककल्याणासाठीच असल्याने नागरिकांनी त्याला सहकार्य करण्याचे आवाहन औदुंबर पाटील यांनी केले. शहरातून वावरणाऱ्या आज अनेक ठिकाणचे रस्ते बंद असल्याने मोठी कसरत करावी लागली. 

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good response in Lockdown in Baramati