mauritius
mauritius

मॉरिशसमध्ये मराठी नाट्य महोत्सवास चांगला प्रतिसाद

नवी सांगवी (पुणे) : मॉरिशस मध्ये 41 वा मराठी नाट्यमहोत्सव नुकताच पार पडला. वाकव्या या शहरातील सर्ज कॉन्स्टटिंन थेटर मध्ये पार पडलेल्या या नाट्यमहोत्सवाला मराठी बांधवांना चांगला प्रतिसाद दिला. या नाट्यमहोत्सवात आठ नाटके सादर करण्यात आली. विशेष म्हणजे या पैकी पाच नाटके स्थानिक नाटककारांने लिहली होती.

सोना धर्मीय लिखित 'भ्रांती', सुनंदा साठे यांनी लिहिलेले 'मम्मी तू अशीच हवीस' आणि शामुनी मराठी स्त्री मंडळीद्वारे प्रस्तुत व रत्नाबाई लक्ष्मण लिखित ' दत्तक ' या तीन नाटकांनी अंतिम फेरी गाठली. त्यातील दत्तक या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवून सर्वोत्कृष्ट नाटक, दिग्दर्शन, सर्वश्रेष्ठ स्थानिक नाटककार व बालकलाकार यांच्यासह एकून सहा पारितोषिके पटकाविली.

मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतलाजी म्हणाले, "1977 मध्ये झालेल्या पहिल्या मराठी नाट्य स्पर्धेसाठी येथून जेष्ठ प्रशिक्षक श्री व सौ मोहन महर्षी, रोबिंदास यांनी आपल्या हौशी कलावंतांना दिलेले मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे मॉरिशसमध्ये लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, वेषभूषाकार तयार झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या सहयोगाने मॉरिशसमध्ये मराठी नाटकाचे दालन समृध्द होईल आणि मराठी नाट्य साहित्याचा विस्तार होईल. "

कला व सांस्कृतिक मंत्री पृथ्वीराज रूपन, मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष डॉ बीदन आबा, मॉरिशस मराठी मंडळी चे सर्व कार्यकारी सदस्य यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

मागच्या वर्षी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले मॉरिशसच्या कलाकारांनी ' हा जावई 'या नाटकाचा प्रयोग महाराष्ट्रभर केला. त्याला राज्यात चांगला प्रतिसादही मिळाला. त्यामुळे शामुनी मराठी स्त्री मंडळींनी तयार केलेल 'दत्तक' या नाटकाचे प्रयोगही पुन्हा महाराष्ट्रात करण्याचा त्यांचा विचार आहे. त्याकरीता प्रायोजकांनी पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com