"सकाळ'च्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

हडपसर - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवारी (ता. 5) "सकाळ' माध्यम समूह, हडपसर मेडिकल असोसिएशन आणि बाइक स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीत महिला, मुले आणि दिव्यांग व्यक्तींनीदेखील सहभाग नोंदविला. रॅलीला नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

ही रॅली हडपसर, भैरोबानाला चौक, रेसकोर्स, हिंदुस्थानी चर्च, बिशप स्कूल, लष्कर पोलिस ठाणे, आंबेडकर पुतळा, लाल देऊळ, पॉवर हाउस, केईएम रुग्णालय, लाल महालमार्गे बुधवार पेठ, "सकाळ' कार्यालय येथे पोचली. तेथे संपादक सम्राट फडणीस यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर याच मार्गाने हडपसरला पोचल्यावर रॅलीचा समारोप झाला. 

डॉ. राहुल झांजुर्णे म्हणाले, ""हडपसरमधील डॉक्‍टरांनी एकत्र येऊन सायकल क्‍लब स्थापन केला आहे. ग्रीन हडपसर हे आमचे स्वप्न आहे. "सकाळ' माध्यम समूहाने पुढाकार घेऊन शहरातील सायकल ट्रॅक सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा; तसेच विविध माध्यमांना एकत्रित करून शहरात सायकल चळवळ रुजविण्यासाठी प्रयत्न करावा. 

डॉ. प्रकाश डुबे पाटील म्हणाले, ""सायकलपटूंनी मोठे ध्येय ठेवून रोज सायकल चालवावी. विविध सायकल स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी रोज नियमित सराव करावा. आवश्‍यक तेथेच वाहनांचा वापर करावा.'' 

नगरसेवक नाना भानगिरे म्हणाले, ""सायकल चालविणे ही काळाची गरज आहे. कारण पेट्रोल, डिझेलचे साठे कधी ना कधी संपणार आहेत; परंतु सायकल चालविल्यामुळे नैसर्गिकरीत्या मनुष्याचा व्यायाम होतो आणि पर्यावरणाचे संवर्धन होते. "सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीतून सायकल वापराबाबतचा संदेश निश्‍चितपणे नागरिकांपर्यंत पोचेल.'' 

हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, सचिव सचिन आबणे, खजिनदार प्रशांत चौधरी, डॉ. ज्ञानेश्‍वर जाधव यांनी या रॅलीचे संयोजन केले. 

Web Title: Good response to Sakal cycle rally